Natepute Express
ललित पंचमीनिमित्त राज्यभरात एकाच वेळी होणार सामूहिक नामस्मरण सोहळा
मुख्य बातमी 1/3

ललित पंचमीनिमित्त राज्यभरात एकाच वेळी होणार सामूहिक नामस्मरण सोहळा

अक्कलकोट स्टेशन श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अक्कलकोट आगमन दिनानिमित्त ललित पंचमीला राज्यभर एकाच वेळी सामूहिक नामस्मरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. अक्कलकोट येथील समर्थ नगरी परिवाराच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही हा उपक्रम राबवण्यात येणार असून, महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटक आणि अमेरिकेतही स्वामीभक्त एकत्रित नामस्मरण करणार आहेत. सर्व स्वामीभक्तांनी आपल्या गावात एकत्र येऊन या सोहळ्यात सहभागी व्हावे आणि स्वामीचरणी सेवा अर्पण करावी, असे आवाहन समर्थ नगरी अध्यात्मिक समितीच्या अध्यक्षा सुखदा ग्रामोपाध्ये यांनी केले आहे.

चपळगाव, बावकरवाडमध्ये घटासाठी घरपोच धान्य सेवा
मुख्य बातमी 2/3

चपळगाव, बावकरवाडमध्ये घटासाठी घरपोच धान्य सेवा

नवरात्रो पार्श्वभूमीवर चपळगाव आणि बावकरवाडी येथे घटस्थापनेसाठी लागणाऱ्या धान्याचे घरोघरी वाटप करण्यात आले. माजी सरपंच वर्षा भंडारकवठे यांच्या संकल्पनेतून राबवला. अनेक कुटुंबांना याचा लाभ झाला. धार्मिक परंपरेचे जतन करत सर्वसामान्य कुटुंबांच्या गरजा लक्षात घेऊन राबवण्यात आलेल्या या उपक्रमातून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडले. हिंदू धर्मात नवरात्रो त्सवातील घटस्थापनेला विशेष महत्त्व आहे. घटामध्ये विविध धान्यांची पेरणी करण्याची परंपरा असल्याने धान्याची व्यवस्था करावी लागते. ही गरज लक्षात घेऊन वर्षा भंडारकवठे यांनी घटस्थापनेसाठी लागणारे धान्य थेट घरापर्यंत पोहोचव ण्याची संकल्पना प्रत्यक्षात आणली. सामाजिक बांधिलकीतून जपतात सेवाकार्य उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी बचत गटांतील महिला, विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच गावातील तरुणांनी सहकार्य केले.

मंगळवेढ्यात नैसर्गिक जलस्रोतावरील अतिक्रमणामुळे टँकर सुरू करण्याची वेळ
मुख्य बातमी 3/3

मंगळवेढ्यात नैसर्गिक जलस्रोतावरील अतिक्रमणामुळे टँकर सुरू करण्याची वेळ

उच्च न्यायालयाचे नैसर्गिक जलस्रोत अतिक्रमणमुक्त करण्याचे आदेश दिलेले असताना त्याची अंमलबजावणी न झाल्यामुळे पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाणी साठवणूक न झाल्याने अशी परिस्थिती उद्भवली आहे. गावोगावी टँकर सुरू करावे लागत आहेत. मूळ नैसर्गिक जलस्रोत खुले केले असते तर टँकर सुरू करण्याची आवश्यकता भासली नसती. सद्य परिस्थितीत तालुक्यातील 82 गावांपैकी 66 गावांत नैसर्गिक जलस्त्रोत आहेत. मात्र त्यावर अतिक्रमण झाल्याने पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. गावोगावी स्थानिक पातळीवर पाणीपुरवठा करणाऱ्या सार्वजनिक विहिरींवरही अतिक्रमण झाले असल्यामुळे यावर शासनाने तात्काळ कारवाई करावी, अशी जनतेतून मागणी होत आहे.

BUSINESS SPOTLIGHT Verified

देवत्व बेकर्स

हॉटेल व बेकर्स

★★★★★ (5.0)

आपल्या नात्यातील गोडवा वाढवणारे आपले हक्काचे ठिकाण!

क्विक टाउन सर्व्हिसेस

व्यवसाय ऑनलाईन आणायचा आहे?

वेबसाईट चालू करा →

महाराष्ट्रातील ताज्या बातम्या आणि नातेपुतेतील स्थानिक व्यवसायांचे विश्वसनीय व्यासपीठ

नातेपुते व आसपासच्या गावांसाठी WhatsApp-first digital portal.

NATEPUTE EXPRESS

Business • News • Ads

📰 मुख्य बातम्या

नातेपुते परिसर ताज्या घडामोडी

सर्व बातम्या पहा
सोलापूर जिल्हा

ललित पंचमीनिमित्त राज्यभरात एकाच वेळी होणार सामूहिक नामस्मरण सोहळा

अक्कलकोट स्टेशन श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अक्कलकोट आगमन दिनानिमित्त ललित पंचमीला राज्यभर एकाच वेळी सामूहिक नामस्मरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. अक्कलकोट येथील समर्थ नगरी परिवाराच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही हा उपक्रम राबवण्यात येणार असून, महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटक आणि अमेरिकेतही स्वामीभक्त एकत्रित नामस्मरण करणार आहेत. सर्व स्वामीभक्तांनी आपल्या गावात एकत्र येऊन या सोहळ्यात सहभागी व्हावे आणि स्वामीचरणी सेवा अर्पण करावी, असे आवाहन समर्थ नगरी अध्यात्मिक समितीच्या अध्यक्षा सुखदा ग्रामोपाध्ये यांनी केले आहे.

महाराष्ट्र

चपळगाव, बावकरवाडमध्ये घटासाठी घरपोच धान्य सेवा

नवरात्रो पार्श्वभूमीवर चपळगाव आणि बावकरवाडी येथे घटस्थापनेसाठी लागणाऱ्या धान्याचे घरोघरी वाटप करण्यात आले. माजी सरपंच वर्षा भंडारकवठे यांच्या संकल्पनेतून राबवला. अनेक कुटुंबांना याचा लाभ झाला. धार्मिक परंपरेचे जतन करत सर्वसामान्य कुटुंबांच्या गरजा लक्षात घेऊन राबवण्यात आलेल्या या उपक्रमातून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडले. हिंदू धर्मात नवरात्रो त्सवातील घटस्थापनेला विशेष महत्त्व आहे. घटामध्ये विविध धान्यांची पेरणी करण्याची परंपरा असल्याने धान्याची व्यवस्था करावी लागते. ही गरज लक्षात घेऊन वर्षा भंडारकवठे यांनी घटस्थापनेसाठी लागणारे धान्य थेट घरापर्यंत पोहोचव ण्याची संकल्पना प्रत्यक्षात आणली. सामाजिक बांधिलकीतून जपतात सेवाकार्य उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी बचत गटांतील महिला, विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच गावातील तरुणांनी सहकार्य केले.

सोलापूर जिल्हा

मंगळवेढ्यात नैसर्गिक जलस्रोतावरील अतिक्रमणामुळे टँकर सुरू करण्याची वेळ

उच्च न्यायालयाचे नैसर्गिक जलस्रोत अतिक्रमणमुक्त करण्याचे आदेश दिलेले असताना त्याची अंमलबजावणी न झाल्यामुळे पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाणी साठवणूक न झाल्याने अशी परिस्थिती उद्भवली आहे. गावोगावी टँकर सुरू करावे लागत आहेत. मूळ नैसर्गिक जलस्रोत खुले केले असते तर टँकर सुरू करण्याची आवश्यकता भासली नसती. सद्य परिस्थितीत तालुक्यातील 82 गावांपैकी 66 गावांत नैसर्गिक जलस्त्रोत आहेत. मात्र त्यावर अतिक्रमण झाल्याने पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. गावोगावी स्थानिक पातळीवर पाणीपुरवठा करणाऱ्या सार्वजनिक विहिरींवरही अतिक्रमण झाले असल्यामुळे यावर शासनाने तात्काळ कारवाई करावी, अशी जनतेतून मागणी होत आहे.

सोलापूर जिल्हा

दुष्काळाचा फटका; पंढरपुरात चाऱ्याची आवक घटली

दुष्काळी परिस्थितीचा फटका आता जनावरांच्या चारा उपलब्धतेलाही बसू लागला आहे. पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोजची चाऱ्याची आवक घटली असून, दुसरीकडे चाऱ्याच्या दरात 30 ते 40 टक्के पर्यंत वाढ झाली आहे. त्यामुळे जनावरांसाठी चाऱ्याची व्यवस्था करताना पशुपालकांना आर्थिक कसरत करावी लागत आहे. यंदा पावसाअभावी पंढरपूर तालुक्यात हिरव्या चाऱ्याची उपलब्धता कमी झाली आहे.खरिपाची कसलीच पेरणी झालेली नाही, त्यामुळे मका, बाजरी आणि इतर खरीप पिकांचा चारा उपलब्ध झालेला नाही. तर शेतातील मका, कडवळ, आणि ऊस अशा चारा पिकांच्या वाढीवर परिणाम झाल्याने बाजारात येणाऱ्या चाऱ्याचे प्रमाणही घटले आहे.

सोलापूर जिल्हा

फलकाअभावी सावळेश्वर, कोळेगावजवळ अपघात

सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर मोहोळ तालुक्यातील सावळेश्वर तसेच कोळेगाव परिसरात पूल बांधणी आणि रस्ता रूंदीकरणाचे काम चालू आहे. तेथे बॅरिकेड, दिशादर्शक फलक न लावल्यामुळे वाहनधारकांना अंदाज येत नसल्याने सावळेश्वर व कोळेगावजवळ कार व ट्रक उलटली. यामध्ये चौघे जण बचावले. याबाबतची अधिक माहिती अशी, ठाकरे सेनेचे कोळेगाव विभागप्रमुख सागर गायकवाड हे कारने (एमएच 14 डीएक्स 0041) मोहोळकडे जात होते. सकाळी 9.30 वाजता मोहोळ तालुक्यातील कोळेगांव जवळ येताच तिथे मोठा खोदलेला रस्ता दिसला तिथे बॅरिकेड नव्हते, रस्ता बाजूने खोदला असून, रुंदीकरणाचे काम चालू आहे, असा फलक नाही. खड्डा पाहून चालकाने अचानक ब्रेक मारल्याने गाडी तीन वेळा उलटली. त्यात ते व त्यांचे सहकारी किरकोळ जखमी झाले.

सोलापूर जिल्हा

करमाळ्यात महिला सुरक्षा अन् कायद्याबाबत पथनाट्यातून जागर

महिला व मुलींनी संकटाच्या प्रसंगी कोणती काळजी घ्यावी, छेडछाड व महिलांवरील अत्याचाराच्या घटना घडल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क कसा साधावा, यासाठीचे असणारे हेल्पलाइन नंबर देण्यात आले. तसेच उपलब्ध कायदेशीर मदत व सुरक्षा यंत्रणांचा वापर कसा करावा, महिला व मुलींनी भीती न बाळगता अन्याया विरोधात आवाज उठवावा, संशयास्पद अथवा त्रासदायक प्रकारांची माहिती तत्काळ पोलिसांना द्यावी आणि सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, असा संदेश पथनाट्यातून देण्यात आला. महिला व मुलींच्या सुरक्षिततेबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने करमाळा निर्भया पथक व करमाळाचा राजा गणेशोत्सव मंडळ, राशीन पेठ, करमाळा यांच्या विद्यमाने करमाळा शहरातील विविध ठिकाणी निर्भया पथक या विषयावर प्रभावी पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते.

नवीन जाहिराती

सर्व पहा →
🚀 डिजिटल व्यवसाय क्रांती

तुमचे दुकान ऑनलाईन आणा आणि ग्राहक वाढवा!

नातेपुते एक्सप्रेसवर स्वतःची Business Website, digital card आणि WhatsApp enquiry मिळवा.

वेबसाईट तयार करा