भास्कर ग्राउंड रिपोर्ट:पीओकेत पाक सैन्य दलाचा मोर्चावरगोळीबार; 12 ठार, 38 लोक जखमी, पीओकेचे शहर सील; 40 हजार लोक रस्त्यावर
Author: Rishiraaj Salunkhe |
Category: International |
16 Jul 2026
पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये (पीओके) पाकिस्तानी सैन्याची दडपशाही वाढत असून रावळकोट ते मुजफ्फराबाद दरम्यान बुधवारी काढण्यात आलेल्या लाँग मार्चपूर्वी पाकिस्तानी सुरक्षा दलांनी जमावावर गोळीबार केल्याचे वृत्त आहे. विविध ठिकाणी झालेल्या चकमकींमध्ये १२ जणांचा मृत्यू झाला असून ३८ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये १० नागरिक, एक रेंजर आणि एका पोलिस कर्मचाऱ्याचा समावेश आहे. आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या जॉइंट अवामी ॲक्शन कमिटीने (जेएएसी) आरोप केला की, सुरक्षा दलांनी साध्या वेशात गोळीबार केला. लाँग मार्च रोखण्यासाठी पाकिस्तानी सैन्य आणि पोलिसांनी रावळकोट, मुजफ्फराबाद आणि आसपासची शहरे सील केली आहेत. महत्त्वाच्या सर्व मार्गांवर बॅरिकेड्स उभारण्यात आले असून सुमारे ४ हजार रेंजर्स, पोलिस आणि फ्रंटियर कोरचे जवान तैनात करण्यात आले आहेत.जेएएसीचा दावा आहे की, दडपशाही असूनही ४० हजारांहून अधिक नागरिक मुजफ्फराबादकडे निघालेल्या लाँग मार्चमध्ये सहभागी झाले आहेत. २७ जुलैच्या निवडणुका पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता मुजफ्फराबाद गाठणे हेच उद्दिष्ट, आंदोलकांचा पवित्रा हा मोर्चा १० जून रोजी मुजफ्फराबादकडे निघणार होता. मात्र पाकिस्तानी दडपशाही, नाकेबंदी व चकमकींमुळे तो रावळकोटमध्येच थांबला. जेएएसीने रावळकोटमधील आंदोलनस्थळावरून सरकारला १४ जुलैपर्यंत ३८ सूत्री मागण्या कळवल्या. मागण्या मान्य न झाल्याने बुधवारी मोर्चा सुरू झाला. त्यात सहभागी एहसान म्हणाले, आमचे लक्ष्य पीओकेची राजधानी मुजफ्फराबाद गाठणे आहे. तेते पुढील रणनीती ठरवली जाईल. लष्करी दडपशाहीविरुद्ध व्हाइट हाऊसबाहेर निदर्शने अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या पीओकेतील १०० वर नागरिकांनी सैन्याच्या दडपशाहीविरोधात व्हाइट हाऊसबाहेर आंदोलन केले. त्यांनी पाकिस्तानी सैन्य हटविण्याची आणि आंतरराष्ट्रीय चौकशीची मागणी केली. ३८ सूत्री मागण्यांसाठी आंदोलन जेएएसीचे आंदोलन ३८ सूत्री मागण्यांवर आधारित आहे. विधानसभेतील १२ राखीव जागा रद्द करणे, स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिक अधिकार देणे, वीज, पीठ व खतांवर अनुदान देणे ,अटकेतील नेत्यांची सुटका करणे, या प्रमुख मागण्या आहेत.