News Image

महापालिका निवडणुकांसाठी प्रभाग रचना वेळापत्रक जाहीर:प्रभाग रचना अंतिम करण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी, जाणून घ्या महत्वाचे टप्पे


राज्यात गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे अखेर गती मिळू लागली आहे. महानगरपालिका, नगरपालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आवश्यक असलेल्या प्रभागरचना प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, ऑक्टोबर 2025 मध्ये ही रचना अंतिम केली जाणार आहे. त्यानंतरच महापालिका व नगरपालिकांच्या निवडणुकांची प्रक्रिया हाती घेतली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने चार महिन्यांचा कालावधी निश्चित केला आहे, ज्यामध्ये प्रभाग रचना अंतिम केली जाईल. मुंबई महापालिकेची प्रभागरचना 6 ऑक्टोबरनंतर, तर ड वर्गातील नाशिक, औरंगाबादसारख्या महापालिकांची प्रभागरचना 13 ऑक्टोबरपर्यंत अंतिम केली जाणार आहे. या महत्त्वाच्या टप्प्यानंतर राज्यातील निवडणुकांची प्रक्रिया सुरु होणार असून, महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या इत्यादींच्या निवडणुका चार टप्प्यांमध्ये पार पडणार आहेत. यासाठी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासूनच मतदान प्रक्रियेची सुरुवात होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोग यासंदर्भात सध्या तयारी करत आहे. दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून कोरोनाचा संसर्ग, ओबीसी आरक्षणाचा पेच, न्यायालयीन प्रक्रिया यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या गेल्या नाहीत. असे असणार महत्त्वाचे टप्पे