कल्पना:हरवलेल्या महिलांचा शोध, सॅनिटरी पॅडवर फोटो; 3 जणी कुटुंबात परतल्या
Category: National |
09 Mar 2026
सॅनिटरी पॅडच्या पाकिटावर घरापासून लांब गेलेल्या आणि मानसिकदृष्ट्या आजारी महिलांचे फोटो छापल्यामुळे तीन महिलांना पुन्हा आपले कुटुंब परत मिळाले.हरियाणातील हिसारच्या राजविंदर कौर यांनी एक वर्षापूर्वीच ‘फ्लोवॅल’ नावाने सॅनिटरी पॅडचे काम सुरू केले होते. त्या मुलींच्या शाळांत आणि आझादनगरमधील भाग्यश्री महिला आश्रमात सॅनिटरी पॅड मोफत देतात.
महिला आश्रमात कुटुंबापासून दुरावलेल्या व मानसिकदृष्ट्या पीडित महिलांची व्यथा पाहिली. तेव्हा त्यांनी आपल्या सॅनिटरी पॅडच्या पाकिटावरच बेपत्ता महिलांचे फोटो छापण्यास सुरुवात केली. यामुळे या आश्रमातील तीन महिला पुन्हा आपल्या कुटुंबास भेटू शकल्या. मूळच्या टोहाना येथील रहिवासी राजविंदर कौर म्हणाल्या, एक वर्षापूर्वी महिलांच्या एका कार्यक्रमात त्यांना बोलावण्यात आले होते. तेथे सॅनिटरी पॅडची कल्पना सुचली. मजूर महिलांनी छायाचित्र ओळखले उत्तर प्रदेशची रहिवासी सुमनचा विवाह गोहानामध्ये झाला होता. ती मानसिकदृष्ट्या आजारी होती एके दिवशी घरातून निघून गेली होती. मजूर महिलांनी बेपत्ता महिलेचा फोटो पाहिला तेव्हा त्यांनी आश्रमात कॉल केला. त्यानंतर फतेहाबाद पोलिसांच्या मदतीने या महिलेची कुटुंबाशी भेट घडवून आणली गेली. राजस्थानच्या सीकर येथील लक्ष्मणगड येथील रहिवासी राजूडी भाग्य श्री यांची भेट ढुंढवा गावाच्या सरपंच अंतर कुमारी यांच्या कॉलनंतर झाली. बिहारच्या अंबारी येथील नेहा ऊर्फ सूरजदेवी २०२० पासून बेपत्ता होत्या. त्यांनाही आता घरी परत पाठवण्यात आले. तीन महिलांना त्यांचे कुटुंब मिळाले सध्या महिला आश्रमात मानसिकदृष्ट्या आजारी ७१ महिला आहेत. राजविंदर कौर यांच्या सॅनिटरी पॅडवर अशा महिलांचे फोटो छापल्यामुळे आतापर्यंत तीन महिलांना त्यांचे कुटुंब मिळाले आहे. - बाला देवी, संचालिका, भाग्य श्री सेवा संस्थान ट्रस्ट, हिसार, हरियाणा