वादग्रस्त श्रद्धा:यूके - ‘डिजिटल पाद्री’ तरुणाईत लोकप्रिय होतायत; ते राष्ट्रवाद, ख्रिश्चन ओळख एकत्र करून प्रचार करतात, याने कट्टरतावादाला मिळते चालना
मिलिटंट ख्रिश्चनिटीवर धर्माला राजकीय शस्त्र बनवण्याचा आरोप ब्रिटनमध्ये एक नवीन धार्मिक चळवळ उदयास येत आहे. तिला “ख्रिश्चन राष्ट्रवाद” असे म्हणतात. ब्रिटनने “ख्रिश्चन संस्कृती” कडे परत यावे असा दावा ते करत आहे. या चळवळीत, ख्रिश्चन चिन...