संदेशखाली प्रकरणातील मुख्य साक्षीदाराच्या कारचा अपघात:कोर्टात जाताना ट्रकची धडक, मुलगा-चालकाचा मृत्यू; कुटुंब म्हणाले- हा पूर्वनियोजित हल्ला
पश्चिम बंगालमधील संदेशखाली हिंसाचार आणि ईडी अधिकाऱ्यांवरील हल्ल्याच्या प्रकरणातील मुख्य साक्षीदार भोला नाथ घोष यांच्या गाडीचा अपघात झाला. बुधवारी दुपारी झालेल्या या अपघातात घोष यांचा धाकटा मुलगा सत्यजीत घोष (३२) आणि कार चालक साहनूर मोल्ला (२७) यां...