
रानोमाळ चल माझ्या दोस्ता:निसर्ग मित्र मंडळाचे वर्षभर कार्यक्रम; जंगल अभ्यास, पक्षी निरीक्षणासह पावसाळी किल्ले भटकंतीची संधी!
छत्रपती संभाजीनगर येथील निसर्ग मित्र मंडळाचे वर्षभराच्या उपक्रमांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे, अशी माहिती निसर्ग मित्र मंडळाचे सचिव किशोर गठडी यांनी दिली. शारीरिकदृष्ट्या सक्षम असलेले निसर्गप्रेमी या उपक्रमात सहभागी होऊ शकतात. इच्छुकांनी खालील संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले. निसर्ग मित्र मंडळातर्फे निसर्गप्रेमींसाठी पावसाळी गिरीभ्रमण, निसर्गभ्रमण सहली व बीजारोपण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सह्याद्री डोंगररांगा तसेच विविध परिसरात गिरिभ्रमण, अभ्यास सहली, आणि पर्यावरण संवर्धनासाठी उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचे गठडी यांनी सांगितले. निसर्ग भ्रमंती – किल्ले व पावसाळी भटकंती पक्षी निरीक्षण / अभ्यासवर्ग
(तारखा 12 ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात येतील) जंगल अभ्यास सहली संपर्क साधण्याचे आवाहन किशोर गठडी म्हणाले, निसर्गाची आवड, निसर्गरक्षण आणि संवर्धनाची जाणीव जनमानसात निर्माण व्हावी, साहस वृत्तीला चालना मिळावी, या उद्देशाने हे उपक्रम राबवले जातात. या मोहिमांमध्ये स्थानिक परिसरातील बियांचे संकलन करून त्याचे बीजारोपणही केले जाते. शारीरिकदृष्ट्या सक्षम नागरिक, विद्यार्थी, संस्था व निसर्गप्रेमी यांना या उपक्रमांमध्ये भाग घेता येणार आहे. शारीरिकदृष्ट्या सक्षम असलेले निसर्गप्रेमी या उपक्रमात सहभागी होऊ शकतात. इच्छुकांनी सकाळी 9 ते संध्याकाळी 7 दरम्यान 9422202628, 8412910423, 9420400383 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.