
दुटप्पीपणा:हमाससोबत युद्धविरामाच्या चर्चेदिवशी येमेनचे बंदर, तळावर इस्रायली हल्ला, इस्रायली शिष्टमंडळ चर्चेसाठी कतारमध्ये, नेतन्याहू अमेरिकेत गेले
इस्रायल आणि हमास यांच्यात कतारमध्ये सोमवारी शांतता चर्चेआधी इस्रायल लष्कराने येमेनमध्ये इराण समर्थित हुथी बंडखोरांच्या बंदरावर निशाणा साधला. सोमवारी पहाटे इस्रायली लष्करी विमानांनी हुदैदा, रास ईसा आणि सलीफमध्ये हुथीच्या नियंत्रणातील बंदरांशिवाय रास कनेटिब स्थित एका ऊर्जा प्रकल्पालावरही निशाणा साधला. इस्रायली संरक्षण मंत्रालयाने दावा केला की, या ठिकाणांचा वापर हुथी इराणकडून शस्त्र तस्करी व इस्रायल व त्याच्या सहकारी देशांवर हल्ल्यासाठी करतो. इस्रायलनुसार, शनिवारी रात्री येमेनमध्ये या हल्ल्याचे एक टार्गेट हुथी लष्कर प्रमुख मुहंमद अल-गमारीही होता. इस्रायली हल्ल्याच्या उत्तरात हुथींनी क्षेपणास्त्र आणि ड्रोन डागले. वेस्ट बँक आणि डेड सीच्या आसपास सायरन वाजले, मात्र कोणत्याही जीवितहानीचे वृत्त नाही. हवाई हल्ल्यांनंतर इस्रायलच्या बेन गुरियन विमानतळ, अश्दोद आणि एलात बंदर तसेच अश्केलोनच्या ऊर्जा केंद्रावर क्षेपणास्त्र हल्ला केला.दुसरीकडे, इस्रायलचे संरक्षणमंत्री काट्झ यांनी ही कारवाई योग्य ठरवत सांगितले की, इराणसाठी जे योग्य आहे, ते येमेनसाठी लागू होईल. जो कुणी इस्रायलवर हात उचलेल, त्याचा हात कापला जाईल. ट्रम्प कराराची घोषणा करू इच्छितात, मात्र अंतिम निर्णय नेतन्याहू यांचा नेतन्याहू यांनी वॉशिंग्टनला पोहोचून गाझा युद्धविराम चर्चेत निर्णायक स्थिती प्राप्त केली. ट्रम्पसोबत त्यांच्या तिसऱ्या बैठकीत ६० दिवसांचा युद्धविराम व ओलिसांच्या सुटकेच्या प्रस्तावावर चर्चा होत आहे. हमासने कायम युद्धविराम आणि यूएनच्या निगराणीत मदतीची मागणी केली आहे. इस्रायलने अटी फेटाळल्या, मात्र चर्चेसाठी कतारमध्ये पथक पाठवले. ट्रम्प कराराची घोषणा करू शकतात. मात्र, अंतिम निर्णय नेतन्याहू यांच्या हाती आहे. गेल्या २४ तासांत इस्रायली हल्ल्यांत गाझात ८० ठार, ३०४ जखमी युद्धविराम वाटाघाटी व नेतन्याहूंच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान गाझातही इस्रायली लष्कराने हल्ले सुरू ठेवले. गेल्या २४ तासांत ८० लोक मारले गेले व ३०४ जखमी झाले. हा हल्ला अमेरिका प्रायोजित युद्धविराम वाटाघाटी निर्णायक वळणावर पोहोचलेला असताना हा हल्ला झाला आहे. या करारात काही इस्रायली ओलिसांची सुटका शक्य आहे. इस्रायलवर हमासच्या हल्ल्यानंतर गाझात ५७,००० पेक्षा जास्त मृत्यू झाले. लेबनॉन, गाझा व इराणमध्ये युद्धविरामाच्या दिवशी इस्रायलचा हल्ला ही पहिलीच वेळ नाही, जेव्हा इस्रायलने युद्धविरामाच्या दिवशी हल्ला केला आहे. त्याने याआधीही असे केले आहे. लेबनॉन : २७ नोव्हेंबर २०२४ रोजी इस्रायल आणि हिज्बुल्लादरम्यान वर्षभर सुरू संघर्षानंतर अधिकृत युद्धविरामाची घोषणा केली होती. मात्र, या दिवशी इस्रायली हवाई दलाने दक्षिण लेबनॉन आणि बेका खोऱ्यात हिज्बुल्लाच्या तळांवर हवाई हल्ले केले. गाझा : गेल्या वेळी इस्रायल-हमास युद्धविराम लागू झाल्यावर इस्रायलने १९ जानेवारी २०२५ रोजी गाझात हल्ला केला होता. यात ३६ पॅलेस्टिनी मारले गेले. इराण : २४ जून २०२५ रोजी ट्रम्प यांच्या अध्यक्षतेखाली इस्रायल-इराण यांच्यात १२ दिवसांचा युद्धविराम लागू झाला. मात्र, चर्चेच्या काही तासांनंतर इस्रायलने तेहरानमध्ये इराणी रडार प्रणालीवर हवाई हल्ला केला.