News Image

पहिले झीरो रेफरल रुग्णालय:हैदराबादच्या ईएसआयसीत सर्व आजारांवर उपचार, एकाही रुग्णाला दुसऱ्या रुग्णालयात पाठवत नाही


हैदराबादमधील सनतनगर येथील ईएसआयसी मेडिकल कॉलेज व रुग्णालयाने सरकारी रुग्णालयांची पारंपरिक प्रतिमा बदलली आहे. हे देशातील पहिले झीरो रेफरल मॉडेल हॉस्पिटल बनले आहे. येथील प्रत्येक जटिल उपचार स्वतःच्या संसाधनांनी केले जात आहेत. एकाही रुग्णाला दुसऱ्या रुग्णालयात पाठवले जात नाही. गेल्या तीन वर्षांत रुग्णालयाने २६ किडनी प्रत्यारोपण केले. त्या सर्व यशस्वी झाल्या. १६०० हून अधिक ओपन हार्ट सर्जरी, मेंदू व मणक्याच्या शस्त्रक्रिया, डायलिसिस घेत असलेल्या महिलेची सुरक्षित प्रसूती आदी जटिल उपचार केले. खासगी रुग्णालयात या सर्व उपचारांचा खर्च लाखो रुपये येतो, परंतु येथे ते मोफत होतात. २१ हजार रुपयांपर्यंत मासिक पगार मिळवणारे कर्मचारी व त्यांच्या कुटुंबातील सदस्य ईएसआय (कर्मचारी राज्य विमा) कार्डसह रुग्णालयात उपचार घेऊ शकतात. अपंगांसाठी मर्यादा २५ हजार रुपये आहे. डीन डॉ. श्रीश कुमार चौहान म्हणाले, रुग्णालयात ६ हजार प्रकारच्या चाचण्या होतात. मुंबईतील टाटा मेमोरियलनंतर फक्त येथेच ‘हर टू डिश’ मार्कर उपलब्ध आहे. यामुळे स्तन, पोट व इतर कर्करोगांचे लवकर निदान होण्यास मदत होते. व्यवस्था अशी की... घरी औषधे पोहोचवण्याची सुविधा येथे ओपीडीमध्ये ३४ विभाग आहेत. १७ सुपरस्पेशालिटीज आहेत. २०२४ मध्ये ८ लाख रुग्ण ओपीडीमध्ये आले. दररोज सरासरी २७३७ रुग्ण येत होते. सुपरस्पेशालिटीमध्ये २४४ बेड आणि मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये ८०० बेड आहेत. २०२४ मध्ये ९६,९२६ अॅडमिट झाले. २०,११७ शस्त्रक्रिया केल्या. ट्रिपल ए प्लस मोबाइल अॅप बनवले. याद्वारे रुग्ण ऑनलाइन अपॉइंटमेंट घेऊ शकतात. रिपोर्ट््स मोबाइलवरही उपलब्ध आहेत.