
आठ वर्षांत ७ हजारांहून अधिक कर्करोग रुग्णांना मोफत उपचार:ब्लड कॅन्सरने झाला मुलीचा मृत्यू
ब्लड कॅन्सरने आपल्या मुलीचा मृत्यू झाल्यानंतर संदीप जरीवाला यांनी कर्कराेग ग्रस्त रुग्णांना मदतीचा निर्णय घेतला. ८ वर्षांत त्यांनी ७ हजारांहून अधिक ब्लड कॅन्सर योद्ध्यांचा खर्च उचलला आहे. त्यांनी रुग्णांची औषधे व जेवणाची व्यवस्था केली. शिवाय मानसिक समुपदेशनही केले. अमेरिकेत स्थायिक गुजरातमधील संदीप यांनी २०१७ मध्ये त्यांची २२ वर्षीय मुलगी प्रियांकाला वाचवू शकले नाही, पण त्यांनी इतर रुग्णांना मदत करण्याचे आश्वासन मुलीला दिले. त्यानंतर त्यांनी ‘प्रियंका जरीवाला मेमोरियल फाउंडेशन’ची स्थापना केली. कर्करोगाने ग्रस्त मुलांसाठी आहार सल्लाही देतात... संदीप म्हणतात की, कर्करोगाने ग्रस्त असलेल्या मुलांच्या उपचारांचा आणि जेवणाचा संपूर्ण खर्च आम्ही उचलतो. ते लवकर बरे व्हावेत म्हणून आम्ही आहार सल्ला देखील देतो. समुपदेशकांची मदतही घेतली जाते. स्तनाच्या कर्करोगाने ग्रस्त महिलांना आवश्यक औषधे मोफत देतात.