News Image

माळेगाव कारखाना:अजित पवारांसह दोन शिलेदार विजयी; तर दुसरीकडे प्रतिस्पर्धी सहकार बचाव पॅनलचे प्रमुख रंजन तावरेंचा परभाव


बारामती परिसरातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या बहुचर्चित निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नीळकंठेश्वर पॅनल बाजी मारण्याच्या तयारीत आहे. कालही रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरू होती. स्वत: अजित पवारांनी ब गटातून विजय मिळवला आहे, तर 21 पैकी जवळपास 13 जागांवर त्यांच्या पॅनलचे उमेदवार पुढे आहेत. तर अजित पवार आणि रतनकुमार भोसले यांच्या विजयाची घोषणा करण्यात आली आहे. तर दुसरीकडे अजित पवार यांच्या पॅनल समोर प्रतिस्पर्धी असणाऱ्या सहकार बचाव पॅनलचे प्रमुख रंजन तावरे यांचा पराभव झाला आहे. या निवडणुकीत त्यांचा 316 मतांनी पराभव झाला आहे. प्रतिस्पर्धी पॅनलचा शिलेदाराचा पराभव झाल्याने अजित पवार हे एकहाती विजय खेचून आणतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. या तिरंगी निवडणुकीत चंद्रकांत तावरेंचे सहकार बचाव पॅनल आणि अजित पवारांचे पॅनल यांच्यातच लढत दिसत आहे. शरद पवारांचे बळीराजा पॅनल असले तरी त्यांचा एकही उमेदवार पुढे दिसत नाही. बारामती लोकसभा मतदारसंघात महत्त्व असलेला हा कारखाना यापूर्वी शरद पवारांच्या ताब्यात होता. त्याची सूत्रे अजित पवारांकडे होती. आता शरद पवारांनी आपले वजन नातू युगेंद्रच्या पारड्यात टाकले होते. शेतकरी सभासदांशी स्वत: संवाद साधला होता. मात्र, त्याचा उपयोग झाला नाही. केंद्र आणि राज्य सरकारमधील सत्तेचा वापर करून माळेगावसाठी 550 कोटी रुपये आणतो, असे आश्वासन अजित पवारांनी दिले होते. ते शेतकरी मतदारांना भावल्याचे दिसत आहे. 21 पैकी 18 जागांचा कल पाहता 14 जागा अजित पवारांकडे मंगळवारी रात्री उशिरा 21 पैकी 18 जागांचा कल पाहता 14 जागा अजित पवारांकडे दिसत होत्या. तावरे गटाला 4 जागा मिळतील असे दिसते. अजित पवार यांच्या पॅनलची सत्ता स्थापन झाल्यास पुणे जिल्ह्याच्या सहकारी क्षेत्रावरील शरद पवारांची पकड ढिली झाली असे म्हणावे लागेल, असा सूर राजकीय विश्लेषकांनी लावला आहे. माझी भूमिका ही प्रत्यक्ष सहभागाची - अजित पवार माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवार यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला आहे. ते विजयी देखील झाले आहेत. या संदर्भात बोलताना शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अनेक वर्षांपासून हा कारखाना माझ्या विचारांवर सुरू होता. मात्र, सत्तेतील व्यक्तीने प्रत्यक्ष निवडणुकीत सहभागी न होण्याची माझी भूमिका असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. यासंबंधी अजित पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ती शरद पवार यांची भूमिका आहे. माझी भूमिका ही प्रत्यक्ष सहभागाची असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे.