
माळेगावात अजित पवारांचेच वर्चस्व:21 पैकी 20 जागा जिंकल्या, चंद्रराव तावरे विजयी; शरद पवारांच्या पॅनलचा दारुण पराभव
राज्यात लक्ष वेधून घेतलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल अखेर जाहीर झाला असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निळकंठेश्वर पॅनेलने मोठा विजय मिळवला आहे. या पॅनेलने 21 पैकी 20 जागांवर विजय मिळवत कारखान्यावर आपले वर्चस्व सिद्ध केले. दुसरीकडे, सहकार बचाव पॅनेलच्या वाट्याला केवळ एक जागा आली असून, शरद पवारांच्या बळीराजा पॅनेलला एकही जागा मिळाली नाही. या निवडणुकीसाठी 22 जून रोजी मतदान पार पडले होते. त्यानंतर जवळपास 35 तास चाललेल्या मतमोजणीत अजित पवारांचा निळकंठेश्वर पॅनेल आघाडीवर राहिला. विरोधी गटातून केवळ सहकार बचाव पॅनेलचे चंद्रराव तावरे हेच एकमेव विजयी उमेदवार ठरले आहेत. माळेगाव साखर कारखान्याची निवडणूक चुरशीची ठरली. अजित पवारांच्या निळकंठेश्वर पॅनेलला चंद्रराव आणि रंजन तावरे यांच्या सहकार बचाव पॅनेलने जोरदार टक्कर दिली. सांगवी गटातून चंद्रराव तावरे विजयी झाले असून, विरोधी गटातील ते एकमेव उमेदवार ठरले. त्यांनी अजित पवारांच्या विरेंद्र तावरे यांचा पराभव केला. निवडणुकीनंतर रंजन तावरे यांनी पराभव स्वीकारत अजित पवारांवर टीका केली. हा जनशक्तीविरोधात धनशक्तीचा विजय असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच अजित पवारांचे स्वप्न पूर्ण झाले नसल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, या निवडणुकीत रंजन तावरे यांनाही पराभवाचा सामना करावा लागला. दुसरीकडे शरद पवार-युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली लढत असलेल्या बळीराजा सहकार बचाव पॅनेलचा सुपडा साफ झाला. त्यांच्या पॅनेलचा एकही उमेदवार निवडून आला नाही. विजयी उमेदवारांची यादी: ब वर्ग 1) अजित पवार भटक्या विमुक्त राखीव 2) श्री विलास देवकाते अनुसूचित जाती राखीव 3) रतन कुमार भोसले इतर मागासवर्ग राखीव 4) नितीन कुमार शेंडे महिला राखीव 5) सौ संगीता कोक
6) सौ ज्योती मुलमुले माळेगाव गट : 01 7) शिवराज जाधवराव
8) राजेंद्र बुरुंगले
9) बाळासाहेब तावरे पणदारे गट : 2 10) योगेश जगताप
11) तानाजी कोकरे
12) स्वप्नील जगताप सांगवी गट : 01 13) चंद्रराव तावरे
14) गणपत खलाटे
15) विजय तावरे शिरवली गट 16) प्रताप आटोळे
17) सतिश फाळके बारामती गट 18) नितीन सातव
19) देविदास गावडे नीरावागज गट 20) जयपाल देवकाते
21) अविनाश देवकाते