News Image

पालकमंत्री बावनकुळेंच्या कामठीत पुन्हा थांबविला बाल विवाह:नवरी हळद लागून तयार होती तितक्यात पोलिसांच्या सहकार्याने पोहोचले बाल संरक्षण पथक


जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कामठी मतदारसंघात बालविवाहाच्या घटना वाढल्याचे समोर आले आहे. येथे होणारा एक बालविवाह पोलिस आणि बाल संरक्षण पथकाने वेळीच केलेल्या कारवाईमुळे टाळण्यात यश आले आहे. मुलांचे आधार कार्ड घेतल्याशिवाय व मुलांची वय निश्चिती झाल्यानुसार मुलगी व मुलगा अल्पवयीन असणार नाही याची खात्री पटल्यानंतरच बुकिंग डेकोरेशनवाल्यांनी, हॉलवाल्यांनी, लग्न लावून दिले जाणार नाही याची काळजी घ्यावी. पोलिस निरीक्षक महेश आंधळे हे कामठी पोलिस स्टेशन अंतर्गत बैठक घेणार आहे. कामठी येथे एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह होत असल्याबाबतची माहिती कामठी नवीन पोलिस स्टेशन येथील पोलिस निरीक्षक महेश आंधळे यांना मिळाली. त्यांनी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुस्ताक पठाण यांना याबाबतची माहिती दिली. जिल्हा महिला बालविकास अधिकारी रंजीत कुरे यांनी तातडीने एक पथक स्थापन करून कामठीत पाठवले आणि पोलिसांच्या सहकार्याने बालविवाह थांबवला. संबंधितांवर प्रतिबंधात्मक कारवाई करून बंधपत्र लिहून घेण्यात आले व अल्पवयीन मुलीला रेस्क्यू करून पोलिसांच्या सहकार्याने बाल कल्याण समिती समक्ष हजर करून बालगृहात दाखल करण्यात आले. कामठीत गेल्या काही महिन्यापासून बालविवाह तक्रारी वाढल्या असून येथील मंगल कार्यालय, डेकोरेशन वाले, कॅटरिंगवाले व लग्न लावून देणारे या सर्वांना पोलिस नोटीस बजावणार आहे. व बालविवाहाकामठी विभागात जनजागृती करणार आहे. बालविवाह कसे रोखता येईल व अल्पवयीन मुलींची सुरक्षा कशी करता येईल, याबाबत पोलिस विभाग व महिला व बालविकास विभाग पाऊल उचलणार आहे. कार्यवाही जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुस्ताक पठाण, पोलिस निरीक्षक महेश आंधळे, संरक्षण अधिकारी साधना हटवार, दीप्ती मोडघरे, रुक्मिणी जंगलवार, ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्टच्या वैष्णवी बावणे यांनी केली