News Image

धायरी परिसरातून दुचाकी चोरणाऱ्या दोघांना अटक:पोलिसांनी सापळा रचून केली कारवाई, चोरीच्या दोन दुचाकी जप्त


पुणे शहरातील सिंहगड रस्ता परिसरात वडगाव धायरी येथून दुचाकी चोरणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे.ओंकार संतोष सातपुते (वय 20, रा. लायगुडे वस्ती, धायरी,पुणे), साईराज अतुल तावरे (वय 18, रा. कांबळे वस्ती, धायरी,पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आराेपीची नावे आहेत. धायरी परिसरातून दोन दुचाकी नुकत्याच चोरीला गेलेल्या होत्या. याप्रकरणी नांदेड सिटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दुचाकी चोरट्यांच्या मागावर पोलिसांचे पथक होते. सराईत चोरटे ओंकार सातपुते आणि साईराज तावरे यांनी दुचाकी चोरी केल्याची माहिती तपास पथकातील पोलिस कर्मचारी मोहन मिसाळ आणि शिवा क्षीरसागर यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून दोनजणांना पकडले. आराेपींच्या चौकशीत आराेपींनी दुचाकी चोरी केली असल्याची कबुली दिली. नांदेड सिटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अतुल भोस,गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गुरुदत्त मोरे, सहायक निरीक्षक राहुल यादव, मिसाळ, क्षीरसागर, राजू वेगरे, उत्तम शिंदे, स्वप्नील मगर, निलेश कुलथे, संग्राम शिनगारे यांनी ही कारवाई केली आहे. गांजा विक्री करणाऱ्याकडून 12 किलो गांजा पाेलीसांकडून जप्त पुणे शहरात लोहगाव परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या एका आराेपीला विमानतळ पोलिसांनी जेरबंद केले आहे. अखिलेश गरीब मंडल (वय 34, रा. लोहगाव) असे अटक करण्यात आलेल्या आराेपीचे नाव आहे. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडून तीन लाख रुपयांचा 12 किलाे गांजा जप्त करण्यात आला. लोहगावमधील कर्मभूमीनगर परिसरात एकजण संशयितरित्या थांबलेला असून त्याच्याकडे अंमली पदार्थ गांजा विक्रीसाठी असल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक नितीन राठोड यांना मिळाली. त्यानुसार तपास पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेवून त्याची अंगझडती घेण्यात आली. त्यावेळी त्याच्याकडील बॅगेत सुमारे 12 किलो गांजा जप्त करण्यात आला. सदर गांजाची किंमत तीन लाख रुपये आहे.आराेपी अखिलेश मंडल हा बांधकाम मजूर असून त्याने गांजा कोठून आणला, याबाबत पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे. विमानतळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गोविंद जाधव, गुन्हे शाखेच्या निरीक्षक आशालता खापरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नितीन राठोड, पोलिस कर्मचारी रुपेश पिसाळ, शैलेश नाईक, राकेश चांदेकर, अंकुश जोगदंडे, दादासाहेब बर्डे आणि पथकाने ही कारवाई केली. दोन दिवसांपूर्वी येरवडा भागात गांजा विक्री प्रकरणात एका तरुणाला अटक करण्यात आली होती. शहरात अमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत. अमली पदार्थ विक्री प्रकरणात अटक करण्यात आलेले विक्रेत्यांची चौकशी करुन अमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्यांचा शोध घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.