
राज-उद्धव मनोमिलनाची बित्तमबातमी:ठाकरेंच्या 2 पत्रकार परिषदा, 2 वेगवेगळ्या घोषणा, मग अचानक निर्णय कसा बदलला?
हिंदी सक्तीविरोधात आणि मराठी भाषेसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत. दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी त्याबाबत आनंद व्यक्त केला आहे. मात्र, काल दोन पत्रकार परिषदा, दोन वेगळ्या घोषणा झाल्यानंतर अचानक असे काय घडले की, दोन्ही ठाकरे एकत्र येण्याचा निर्णय आज जाहीर झाला. या विषयी महाराष्ट्रातील नागरिकांच्या मनात उत्सुकता पाहायला मिळत आहे. ठाकरे बंधूच्या मनोलिनासाठी सर्वांत महत्त्वाचा ठरला तो राज ठाकरे यांनी केलेला एक फोन. राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी फोन करून एकत्र आंदोलन करण्याची भूमिका मांडली. त्यानंतर या सर्व घडामोडी घडल्या असल्याचे संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. या सर्व घटनांमागची इनसाइड स्टोरी देखील त्यांनी माध्यमांना सांगितली. काल काय घडले ते पाहा.... हिंदी सक्तीचा आरोप का? महाराष्ट्रात 5+3+3+4 या मॉडेलनुसार राष्ट्रीय शिक्षण धोरण लागू केले जात आहे. त्यासाठी 1 ली ते 5 वी साठी मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये हिंदी ही तिसरी सक्तीची भाषा करण्याचा निर्णय घेतला गेला. त्याला विरोध झाल्यावर सरकारने मराठी सक्तीची असेल, इंग्रजी ही दुसरी भाषा असेल आणि तिसरी भाषा ऐच्छिक असल्याचे सांगितले. नव्या नियमानुसार विद्यार्थ्यांना हिंदीची सक्ती नाही. इतर कोणतीही तिसरी भाषा येते. पण ही भाषा शिकण्यासाठी किमान 20 विद्यार्थी असणे बंधनकारक आहे. तरच त्यांना शिक्षक मिळेल. अन्यथा त्या विद्यार्थ्याने निवडलेली भाषा ही ऑनलाइन शिकवली जाईल. त्यामुळे पुन्हा एकदा हिंदीची सक्ती केली जातेय, असा आरोप होतोय. हिंदी लादणे अन्यायकारक साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष आणि लोकसाहित्याच्या अभ्यासक डॉ. तारा भवाळकर यांनीही हिंदी लादण्याला विरोध केलाय. डॉ. तारा भवाळकर म्हणाल्या की, 'मूल सहा वर्षांचे असताना शाळेमध्ये येते. ते अतिशय लहान असते. त्याच्या शारीरिक, मानसिक, बौद्धीक क्षमता लक्षात घेतल्या जाव्यात. अर्थात बसणं हे सुद्धा त्या मुलाला अवघड होतं. सगळे विषय, शाळा ही त्या मुलाला नवीन असतात. अशा वेळेला त्याच्यावर अन्य भाषा लादणे हे अन्यायकारक आहे. अशैक्षणिक आहे. इंग्रजी पहिलीपासून शिकवली जाते. तिही त्या मुलावर अन्यायकारक आहे. कारण सुरुवातीपासून परकीय भाषा शिकवली, तर त्याला धड मातृभाषाही येत नाही. परकीय भाषाही येत नाही. मुलाला चौथीपर्यंत मातृभाषेत शिक्षण दिले. त्याचा भाषेचा पाया पक्का झाला. मग कुठलिही भाषा आकलन करणे सोपे जाते. कवी दिवटेंची पुरस्कार वापसी महाराष्ट्रात हिंदी भाषेला तिसरी भाषा म्हणून लादण्याला विरोध करत कवी हेमंत दिवटे यांनी महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार परत करणार असल्याची घोषणा सोशल मीडियावर पोस्ट करून केलीय. त्यात ते म्हणतात की, 'हिंदी भाषेला तिसरी भाषा म्हणून लादण्याच्या निर्णयाचा निषेध म्हणून मला पॅरानोया ह्या कवितासंग्रहासाठी मिळालेला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार रकमेसकट परत करीत आहे. सरकारने निर्णय मागे घेतला तरच मी माझा निर्णय मागे घेईन.' दिवटे यांच्या या निर्णयाची मराठीतील अनेक कवी, साहित्यिक, समीक्षकांना पाठराखण केली आहे. तसेच हा निर्णय योग्य असल्याचे म्हटले आहे. संबंधित वृत्तः VIP इंटरव्ह्यू: 'हिंदी'ची सक्ती नाही:तिसरी भाषा हे केंद्राचे धोरण, त्यात राजकारण नको; शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांचे आवाहन हिंदीच काय पहिलीपासून इंग्रजीही नको:तारा भवाळकर यांची कणखर भूमिका; अरविंद जगताप म्हणाले- सक्तीच्या भक्तीने देवाची बदनामी! मनसेच्या मोर्चावर आमचा ॲप्रोच निगेटिव्ह नाही:शरद पवारांची स्पष्टोक्ती; 'मराठी'वर ठाकरे बंधूंचे स्टेटमेंट चुकीची नसल्याची पुस्ती