News Image

महापालिकेच्या निवडणुका एकोप्याने कशा लढल्या जातील यावर चर्चा:इतर पक्षांची आज गरज भासत नाही, खासदार सुनील तटकरे यांचे मत


महाराष्ट्रात आता स्थानिक स्वराज्य संस्थानच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. आगामी महापालिका निवडणुका जवळ आलेल्या असताना देखील नाशिक आणि रायगड येथील पालकमंत्री पदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. या सगळ्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष व खासदार सुनील तटकरे यांनी भाष्य केले आहे. रायगड येथे शिंदे गटासोबत बिनसल्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस शेतकरी कामगार पक्षासोबत हातमिळवणी करणार का असा प्रश्न सुनील तटकरे यांना विचारण्यात आला होता. यावर बोलताना तटकरे म्हणाले, मला इतर पक्षांची गरज आज संभावत नाही. शेकाप आणि त्यांच्या पक्षातील कोणत्याच नेत्याशी संवाद देखील नासल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका करताना युतीमध्ये सामंजस्य कसे राहील. तसेच या निवडणुका एकोप्याने कशा लढता येतील या संदर्भातील चर्चा झाल्याची माहिती सुनील तटकरे यांनी दिली आहे. परंतु यावेळी बोलताना रायगडमधील राजकीय परिस्थितीवर भाष्य करणे त्यांनी टाळले आहे. भास्कर जाधव हे राज्यातील प्रमुख आणि ज्येष्ठ नेते सध्या शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव चर्चेत आहेत. त्यांनी शरद पवारांची साथ सोडली हे चुकल्याचे म्हटले होते. यावर प्रतिक्रिया देताना सुनील तटकरे म्हणाले, भास्कर जाधव यांचे हे विधान मागच्या मुलाखतीत सुद्धा केले होते. जाधव हे राज्यातील प्रमुख आणि ज्येष्ठ नेते आहेत. भास्कर जाधव यांनी त्यांचे कर्तुत्व, दांडगा जनसंपर्क आणि संघटन कौशल्य यामुळे उंची गाठली आहे. त्यांनी केलेले विधान हे त्यांच्या राजकीय अनुभवावरून असू शकते, असे मत सुनील तटकरे यांनी व्यक्त केले आहे. शक्तिपीठ महामार्गाबद्दल समन्वयाची भूमिका घेऊ महाराष्ट्रातील कोल्हापूर, धाराशिव आणि सोलापूर या जिल्ह्यातून शक्तिपीठ महामार्गाला मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. यावर बोलताना सुनील तटकरे म्हणाले, राज्यात अनेक पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महायुती करत आहे. त्यामुळे अटल सेतू, हार्बर लिंक, कोस्टल हायवे, मुंबई पुणे हायवे, वसई विरार कॉरिडॉर, समृद्धी महामार्ग असे मोठे प्रोजेक्ट करत असताना सरकारला कर्ज घ्यावेच लागते. त्यामुळे शक्तिपीठ महामार्गाला जरी कोल्हापूर आणि सांगली मधील शेतकऱ्यांचा विरोध असेल तरी त्याबाबत समन्वयाची भूमिका राज्य शासन घेईल. निर्धारित वेळेत त्या त्या विभागाला निधी मिळेल लाडकी बहीण योजनेमुळे इतर विभागांना निधी पुरवला जात नसल्याची टीका विरोधकांकडून केली जात होती. यावर बोलताना सुनील तटकरे म्हणाले, निर्धारित वेळेत त्या त्या विभागाला निधी मिळेल. 30 जूनला होणाऱ्या अधिवेशनात याबाबतीत तिढा सोडविण्यात येईल. तसेच कर्जबामाफी, विद्युत माफीवर वित्त विभाग कधीच मान्यता देऊ शकत नाही. मात्र लोकांचं सरकार हे लोकांसाठी काम करत असल्यामुळे वित्त विभागाने असे मत व्यक्त केल्याचे तटकरे म्हणाले. हिंदी अनिवार्य करू नये हिंदी सक्तीच्या निर्णयामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. यामुळे सरकारलाही मोठ्या प्रमाणात विरोधाचा सामना करावा लागत आहे. यावर सुनील तटकरे म्हणाले, तिसरी भाषेचा पर्याय ठेवणे हे आमचे मत आहे. आपली मराठी मातृभाषा आहेच आपल्याला भाषेचा अभिजात दर्जा मिळाला हे सुद्धा अत्यंत आनंदाचे. परंतु आपल्याला राष्ट्रीय स्तरावर जायचे असेल तर हिंदी भाषा किंवा पर्याय भाषा काळाची गरज आहे. परंतू पहिलीपासून हिंदी सक्ती करणे हे योग्य राहणार नाही. उद्याच्या काळात येणाऱ्या मुलांना हिंदी अवगत होणे गरजेचे आहे. ही करत असताना मराठी भाषेवर अन्याय होणार नाही, असे तटकरे म्हणाले.