News Image

'संविधान हत्या दिवस' हास्यास्पद:वडेट्टीवार यांनी भाजपला सुनावले; रोज संविधानाची हत्या, अघोषित आणीबाणी असल्याचा आरोप


देश स्वतंत्र होत असताना ज्यांनी स्वातंत्र्याला विरोध केला. इंग्रजांच्या विचारधारेच्या विरोधात सर्व देश उभा असताना ज्यांची विचारधारा इंग्रजांसोबत उभी होती. ज्यांनी 55 वर्षांपर्यंत तिरंगा फडकवला नाही. अशा लोकांनी लोकशाहीचे हत्या केली किंवा संविधानाची हत्या केली असे बोलणे, चुकीचा आहे. हे सर्व हास्यास्पद असल्याचे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. या माध्यमातून वडेट्टीवार यांनी भाजपच्या वतीने पाळण्यात येत असलेल्या 'संविधान हत्या दिवस' याला विरोध केला आहे. सध्या रोजच संविधानाची हत्या होत असल्याचा आरोपही वडेट्टीवार यांनी केला आहे. सध्या देशात अघोषित आणीबाणी असल्याचा दावा देखील त्यांनी केला. भाजप याला 'संविधान हत्या दिवस' म्हणत आहेत हे हास्यास्पद आहे. कारण ते दररोज संविधान बदलण्याबद्दल बोलतात. त्यांचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री मनुस्मृती त्यांच्या टेबलावर ठेवून त्यांचा संविधानावर विश्वास नसल्याचे सांगतात. भाजमधील बरेच जण संविधान बदलण्याबद्दल आणि मनुस्मृती लागू करण्याबद्दल बोलत असतात. जे दररोज संविधानाची हत्या करत आहेत, त्यांना त्याबद्दल बोलण्याचा अधिकार नसल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. आणीबाणी नंतर जनतेने इंदिरा गांधी यांना प्रचंड बहुमत दिले भाजप जेव्हा आणीबाणी विषय बोलतो, त्यावेळी इंदिरा गांधी यांनी आणीबाणी नंतर स्वतः निवडणूक लढवली होती. त्यानंतर देखील जनतेने इंदिरा गांधी यांना प्रचंड बहुमत दिले होते. म्हणजेच आणीबाणी लागू करणे ही त्यावेळची गरज होती, असा दावा देखील विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. देशात रोज संविधानाची हत्या सध्या आपल्या देशात रोजची आणीबाणी झाली आहे. ही अघोषित आणीबाणी असल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. आज संविधानावर कोण चालतंय? आज तर मन मर्जीने काम चालू आहे? आज पन्नास वर्षानंतर ते आज संविधान हत्या दिवस असल्याचे म्हणत आहे. जे रोज संविधानाची हत्या करतात, त्यांना हे बोलण्याचा अधिकार नाही. त्यांनी असे बोलणे म्हणजे हास्यास्पद असल्याचे त्यांनी म्हटले आहे.