News Image

तोडगा निघाला नाही तर मैत्रीपूर्ण लढत:आगामी महापालिका निवडणुकांची स्ट्रॅटजी, गिरीश महाजन यांनी सांगितला महायुतीचा प्लॅन


महाराष्ट्रात येत्या काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थानच्या निवडणुका होणार आहेत. स्थानिक पातळीवरील या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. स्थानिक पातळीपर्यंत पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच या निवडणुका युती, आघाडी म्हणून लढवल्या जाणार आहेत की स्वबळावर लढवल्या जाणार, याबाबत देखील उत्सुकता आहे. या सगळ्यावर भाजप नेते व मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तोडगा निघाला नाही तर मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते गिरीश महाजन म्हणाले, जागावाटपाचा निकष अद्याप ठरलेला नाही. ज्या जागा पक्षाच्या चिन्हावर लढवल्या गेल्या, ज्या सिटिंग जागा आमच्या आहेत, त्या जागा आमच्याच आहेत, आणि हा विषय जर गुंतागुंतीचा होत असेल, तर त्यावर चर्चा करून तोडगा काढण्यात येईल. त्यावर मार्ग निघू शकतो. मात्र आम्ही महायुतीच्या माध्यमातूनच या सर्व निवडणुका लढणार आहोत, फार काही तोडगा निघाला नाही तर मैत्री पूर्ण लढत होऊ शकते, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, गिरीश महाजन आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरूच असते. काही दिवसांपूर्वीच एकनाथ खडसे यांनी मी भाजपमध्ये असताना गिरीश महाजन माझे सामान्य कार्यकर्ते होते, असे म्हणत टोला लगावला होता. खडसे यांनी केलेल्या या टीकेवर गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर दिले आहे. एकनाथ खडसेंच्या टीकेला प्रत्युत्तर एकनाथ खडसे यांना प्रत्युत्तर देताना गिरीश महाजन म्हणाले, बरोबर आहे बरोबर आहे मी साधा कार्यकर्ताच आहे. लहानपणापासून मी संघाचा स्वयंसेवक आहे, खडसे साहेबांना म्हणा मी बाल स्वयंसेवक होतो, मी भाजप युवा मोर्चाचा कार्यकर्ता होतो. तालुक्याचा त्यानंतर जिल्ह्याचा मग राज्याचा झालो. हे 1990 साली आले, मी शाळेत होतो, तेंव्हापासून शाखेत जात होतो. मी त्यांना कार्यकर्ता म्हणणार नाही, त्यांना नेताच म्हणेल, असे महाजन म्हणाले. मित्र पक्षात थोडीफार कुरबुर असते राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर शिवसेना शिंदे गटाचे नेते व मंत्री नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. यावर देखील गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गिरीश महाजन म्हणाले, कुठेही नाराजी नाहीह. काल सर्वांची बैठक झाली. मीही त्या बैठकीला होतो. सर्व पक्षनेत्यांची बैठक झाली, कुठेही नाराजी नाही. काही कुरबुर थोडीफार असते. पक्षात पण असते आणि मित्र पक्षात पण असते. पण नाराजी माध्यमांमधून दिसते. आमच्यामध्ये एकमत आहे आणि एकमतानेच आम्ही पुढच्या सर्व निवडणुका लढवणार आहोत, असे महाजन म्हणाले. निवडणुका नवीन वर्षात दिवाळीच्या आसपास महापालिका निवडणूक होण्याची शक्यता मावळली असून राज्याच्या नगरविकास विभागाने यापूर्वी ११ जून ते ४ सप्टेंबरपर्यंत चालणारा प्रभागरचना तयार करण्याचा कार्यक्रम आता ११ जून ते ६ ऑक्टोबर असा लांबला आहे. अंतिम प्रभागरचना झाल्यानंतर मतदार यादी पुनर्निरीक्षण कार्यक्रम तसेच अंतिम प्रसिद्धीसाठी जवळपास दीड महिना लागणार असल्यामुळे निवडणुका नवीन वर्षामध्ये होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. नगर परिषद ड वर्ग मनपाचा कार्यक्रम असा असेल असा आहे मुंबई तसेच अ, ब, क मनपाचा नवीन कार्यक्रम