आई - बहिणीवरून शिवी दिली तर 500 रुपये दंड:सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्यास 100 रुपये दंड; कोळगाव ग्रामपंचायतीचा ऐतिहासिक निर्णय
अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव ग्रामपंचायतीने महिलांच्या सन्मानासाठी एक ठोस आणि वेगळा निर्णय घेतला आहे. ग्रामीण भागात सहजपणे वापरल्या जाणाऱ्या आई-बहिणींवरून दिल्या जाणाऱ्या शिव्यांना आळा घालण्यासाठी ग्रामसभेत थेट आर्थिक दंडाची...